शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीकांचन येथे व्यापाऱ्यावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 23:32 IST

गावठी पिस्तुलाचा वापर : दुचाकीवरून दोघा जणांनी केला हल्ला

उरुळीकांचन : उरुळीकांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकातील महात्मा गांधी विद्यालय रस्तावरील प्रसिद्ध वापारीमल सावलदास या होलसेल कपडे विक्रेत्याच्या दुकानावर मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला आहे. दुकानावर दर्शनी भागावर झालेल्या गोळीबारात दुकानासमोर मांडलेल्या शोभेच्या पुतळ्याला भेदून गोळी आरपार गेली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून मुख्य गावातील नारायण मोबाईल शॉपी दुकानासमोरही गावठी कट्ट्यातून आणखी एक गोळी झाडून हल्लेखोर पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.

उरुळीकांचनमधील महात्मा गांधी विद्यालय रस्त्यावर वापारीमल सावलदास हे प्रसिद्ध होलसेल कपडे विक्रेते दालन आहे. इंदरशेठ वापारीमल दर्डा यांच्या मालकीच्या या कपडा दालनात मंगळवारी नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. दालनात सायंकाळी ६ च्या सुमारास दुचाकीवरून सोलापूर महामार्गावरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दुकानाच्या दर्शनी भागासमोरून पंधरा फूट अंतरावरून गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यानंतर आरोपी दुचाकीवरून महात्मा गांधी विद्यालय रस्तामार्गे पसार झाले. या हल्ल्यावेळी दालनात कॅश काऊंटरवर दोन महिला कर्मचारी काम करीत होत्या. त्यांच्यासमोरील शोभेच्या पुतळ्यावर गोळी आरपार झाल्याची आढळून आली आहे. हल्लेखोरांनी या रस्त्यावरूनच पुढे जाऊन मुख्य गावात नारायण मोबाईल शॉपी या दुकानासमोर हवेत गोळीबार केला. हल्लेखोर २० ते २५ वर्षे वयोगटातील असून एकाने लाल रंगाचा शर्ट, तर दुसºयाने काळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.या हल्ल्याचा प्रकार घडताच लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून हल्लेखोरांंची माहिती काढण्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उरुळीकांचनमधील प्रसिद्ध व्यापाºयांवरखंडणीसाठी दहशत माजविण्याच्या दृष्टीने हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.

टॅग्स :Firingगोळीबारuruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारी