गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर केली मोकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:49 IST2018-01-12T16:44:56+5:302018-01-12T16:49:08+5:30
पिंपरीगाव येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे.

गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर केली मोकाची कारवाई
पिंपरी : पिंपरीगाव येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे.
सचिन दत्तू नढे (वय ३०), अविनाश दत्तू नढे (वय २८), प्रतीक सुरेश वाघेरे (वय २१, रा. पिंपरी), बाबाराव ऊर्फ बाब्या सोमलिंग पाटील (वय २०), विकी शंभूसिंग सुतार (वय २३), बबलू महावीर पाल (वय ३०), हितेश ऊर्फ छोट्या दिनेश लिंगवत (वय ३०), विजय अरुण नढे (वय २७), राहुल कैलास विश्वकर्मा (वय २१) या नऊ जणांवर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे.
पिंपरी येथे भरदिवसा झालेल्या गोळीबारातील फरार तीन आरोपीही पिंपरी पोलिसांनी अटक केले आहेत. पिंपरीत १५ सप्टेंबरला येथे भरदिवसा संतोष अशोक कुरावत याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एक गाडी व दोन पिस्तूल असा मुद्देमालही आरोपींकडून जप्त केला होता. संतोष कुरावतसोबत असलेले २०१७च्या निवडणुकीतील भांडण, तसेच आधीच्या भांडणाचा राग मनात धरून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. कुरावत हा देखील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावरही गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून काळेवाडी परिसरातून निवडणूक लढवली होती.