शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

फटाके विक्रेत्यांचे निघाले दिवाळे, यंदा 30 टक्क्यांनी विक्री कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:49 IST

न्यायालयाचा आदेश : अर्थकारणावर परिणाम

पिंपरी : दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्याकडे भर दिला जातो. मात्र, आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध आणल्याने यंदा फारशे फटाके वाजलेच नाहीत, असा अनुभव आला. त्यामुळे मागणी कमी असल्याने फटाक्यांची विक्री तीस टक्क्यांनी कमी झाली आहे. परिणामी फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आल्याचे दिसून आले.

दीपोत्सव जसा आकाशकंदील, पणत्या, दीव्यांचा, गोड पदार्थांचा आहे, त्याचप्रमाणे आतषबाजीचाही सण आहे. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण फटाके वाजविण्याचा आनंद लुटतात. दिवाळीपूर्वी पंधरा दिवस अगोदरच बाजारपेठेत फटाके उपलब्ध असतात. फटाक्यांचे विविध प्रकार दाखल होत असतात. दरवर्षी फटाक्यांची मागणी ही वाढतच असते. मात्र दरवेळी प्रमाणे यावर्षीही पिंपरीतील अनेक फटाका व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके मागवले होते. फटाक्यांची विक्रीच कमी झाल्यामुळे फटाके व्यापाºयांमध्ये चिंता आहे.न्यायालयाची भीतीरात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवता येतील, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे फटाके वाजविण्यावर निर्बंध आले होते. याबाबत मुंबईत गुन्हेही दाखल झाले होते. न्यायालयाची भीती नागरिकांना होती. तसेच शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय यांच्याकडून वेळोवेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी महापालिकेने जनजागृती केली होती. त्यामुळे नागरिकांनी फटाके खरेदी न करण्यावर भर दिला.महागाईचा फटकाऔद्योगिक मंदीचा परिणामही फटका विक्रीवर दिसून आला. कपडे, मिठाई, आकाशकंदील, पणत्या, फराळाचे साहित्य खरेदी केल्यावर फटाके खरेदी करण्यासाठी पैसेच उरले नाहीत, असे अनेकांनी सांगितले. अनेकांनी फटाके खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. व्यावसायिकांची कोंडी झाल्याने यंदाच्या दिवाळीमध्ये तोंडचे पाणी पळाल्याचे दिसून आले. मोठा आवाज करणाºया फटाक्यांची मागणी सुरुवातीपासूनच कमी होती. दरवर्षीपेक्षा या वेळी ३०-३५ टक्के फटाके विक्री कमी झाली आहे.दिवाळीत फटाके खरेदी करण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. मात्र, यंदा ग्राहकांची संख्या कमी होती. त्याची कारणे अनेक आहेत. परिणामी फटाके पडून आहेत. विकत घेतलेला फटाक्यांचे काय करायचे हा प्रश्न आहे़ यंदा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.- विक्रांत शर्मा, फटाके व्यापारी

टॅग्स :Puneपुणेfire crackerफटाके