शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कागद छपाईच्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:09 IST

भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. 

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील कागद छपाईच्या कारखान्याला शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात धूर पसरला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. 

भोसरी एमआयडीसीतील पवना इंडस्ट्रीज येथील २१ नंबरच्या गाळयात कृष्णा प्रिंटर्स हा कागद छपाईचा कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास येथे नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करीत असताना १ वाजून ४० मिनिटांनी अचानक आग लागली. याठिकाणी मोठ्याप्रमाणात कागद असल्याने सुमारे ३० मीटर अंतरापर्यंत धूर पसरला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात धूर असल्याने घटनास्थळापर्यंत पोहोचणे कठीण होते. अशातही अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन दीड तासात आग आटोक्यात आणली. निगडी प्राधिकरण आणि भोसरी केंद्राची प्रत्येकी एक तर संत तुकारामनगर केंद्राच्या चार अशा एकूण सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, प्रसाद चव्हाण, नामदेव शिंगाडे यांच्यासह ३० ते ३५ कर्मचारयांनी आग आटोक्यात आणली.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल