शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीमध्ये आगीत तीन दुकाने खाक; घरेदेखील काळवंडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 10:21 IST

Fire in Pimpri : महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेपूर्वी अडीचच्या सुमारास मिलिंद नगर येथे झुलेलाल घाट परिसरातील तीन दुकानांना आग लागली.

पिंपरी : अचानक लागलेल्या आगीमुळे तीन दुकाने खाक झाली. पिंपरी येथील मिलिंद नगर येथे बुधवारी (दि. १०) ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. (major fire at three shops in Pimpri)

महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेपूर्वी अडीचच्या सुमारास मिलिंद नगर येथे झुलेलाल घाट परिसरातील तीन दुकानांना आग लागली. किराणा, भंगार तसेच लाकडाच्या दुकानामुळे आगीने लगेच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे तीनही दुकानांतील साहित्य किराणामाल खाक झाला. ही बाब निदर्शनास येताच काही नागरिकांनी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या १४ जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.

पहाटे सव्वापाच वाजता आग विझवण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट यामुळे येथील घरे व इमारतीच्या भिंती काळवंडल्या. आग लागल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी सतर्कता दाखवत शेजारील घरांमधील नागरिकांना बाहेर काढले. तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली. सुदैवाने आगीत जीवित हानी झालेली नाही. या आगीत दुकानांमधील साहित्य खाक झाले. नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.

टॅग्स :fireआगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड