शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाकडमध्ये बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 2:44 PM

मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने बाेगस दवाखाना सुरु करुन रुग्णांना लुटणाऱ्या डाॅक्टरवर वाकड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने बोगस दवाखाना चालवून रुग्णांना लुटणाऱ्या बोगस डॉक्टरवर वाकड ठाण्यात शनिवारी (दि १२) गुन्हा दाखल करण्यात आला.       संदीप विश्वास (रा नढे नगर, काळेवाडी) असे त्या ठग डॉक्टरचे नाव असून याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील संगीता तीरुमनी यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर बोगस डॉक्टरने आपले शटर बंद करून पळ काढला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहितीनुसार संदीप विश्वास हा काळेवाडी येथील तापकीर चौकात मूळव्याध उपचार दवाखाना या नावाने क्लिनिक चालवायचा मात्र या डॉक्टरने  कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतले नसून त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही प्रमाणपत्र नाही, तरीही तो रुग्णांची उपचाराच्या नावाखाली लूट करीत असल्याची कुणकुण महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला लागली हाेती.  वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तरवील यांनी या रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतर वाकड पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार या बाेगस डाॅक्टरवर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर अक्त १९६१ (३३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडdocterडॉक्टर