अखेर संकेतस्थळावर नवीन वर्षातील सुट्या

By Admin | Updated: January 26, 2017 00:14 IST2017-01-26T00:14:12+5:302017-01-26T00:14:12+5:30

नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या संकेतस्थळावर सन २०१६ च्याच शासकीय सुट्यांची

Finally, New Year's Holidays at the website | अखेर संकेतस्थळावर नवीन वर्षातील सुट्या

अखेर संकेतस्थळावर नवीन वर्षातील सुट्या

देहूरोड : नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या संकेतस्थळावर सन २०१६ च्याच शासकीय सुट्यांची यादी झळकत असल्याचे वृत्त ‘लोकमने प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने मंगळवारी सकाळीच कॅन्टोन्मेन्टच्या संकेतस्थळावर सन २०१७ मधील शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध झाली आहे.
बोर्डाच्या संकेस्थळावर पहिल्या पानावर प्रशासन या शीर्षकाखाली सुट्या या सदरात शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. मात्र, ती २०१६ सालातील शासकीय सुट्यांची होती. गतवर्षीच्या सुट्यांच्या यादीमुळे सामान्य जनतेची दिशाभूल होत होती. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी (दि.२४) ‘कॅन्टोन्मेन्टच्या संकेतस्थळावर गतवर्षीच्या सुट्यांची यादी’ या शीर्षकाने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत बोर्ड प्रशासनाने मंगळवारी सकाळीच संकेतस्थळावर सुट्या या शीर्षकाखाली सन २०१७ या सालातील शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध केली आहे. बोर्ड प्रशासनाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बोर्डाच्या संकेस्थळावर तातडीने सन २०१७ च्या शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध केल्याबद्दल लोकमत व कॅन्टोन्मेन्ट बोर्डाला नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Finally, New Year's Holidays at the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.