शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अखेर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास; सलग सुट्ट्यांमुळे झाली होती कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:46 IST

वाहतूककोंडीने बेजार झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने आज (सोमवार, दि. २५) मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सकाळच्या वेळी पाहायला मिळाले.

ठळक मुद्देवाहतूककोंडीने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक झाले होते बेजाररात्री उशिरा खंडाळा घाटातील संपली कोंडी, सकाळपासून द्रुतगती मार्गाने घेतला मोकळा श्वास

लोणावळा : सलग सुट्टयांमुळे वाहतूककोंडीने बेजार झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने व खंडाळा घाटाने आज (सोमवार, दि. २५) मोकळा श्वास घेतल्याचे चित्र सकाळच्या वेळी पाहायला मिळाले. मागील दोन दिवस द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने यंत्रणा हतबल तर वाहनचालक व पर्यटक नागरिक बेजार झाले होते.शनिवार, रविवार व सोमवार हे ३ दिवस सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता लाखोंच्या संख्येने पर्यटक वेगवेगळ्या पर्यटनस्थळांकडे निघाले. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह, गोवा हायवे, नाशिक हायवे, सातारा हायवे, कोल्हापूर हायवसह सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तर खालापूर टोलनाका ते खंडाळा एक्झिटपर्यंत पुणे मार्गीकेवर वाहनांची गर्दीच गर्दी झाल्याने ही कोंडी सोडविण्याचे मोठे आव्हान यंत्रणांच्या समोर उभे राहिले होते. रात्री उशिरा खंडाळा घाटातील वाहनांची कोंडी संपली व आज सकाळपासून द्रुतगती मार्गाने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. अमृतांजन पूल परिसरातील तीव्र चढणीवर काहीशी रांग दिसत असली तरी आज कोठेही कोंडी नसल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाMumbaiमुंबईPuneपुणे