पिंपरी : मराठा समाजाच्या मागण्यांची वेळीच दखल घेतली गेली नाही. केवळ आश्वासने देण्यात आली. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनात तरूणांना बलिदान द्यावे लागले. या परिस्थितीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे. औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले.तसेच पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटूंबियांना शासनाने भरपाई द्यावी. या मागण्यांची दखल न घेतल्यास १० कार्यकर्त्यांंसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. मराठा मोार्चाचे समन्वयक प्रकाश जाधव, नकुल भोईर, सतीश काळे, वैभव जाधव,अमोल मानकर ,धनाजी येळकर, हर्षवर्धन भोईर,अभिषेक म्हसे,राजेंद्र देवकर आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सकल मराठा मोर्चाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:58 IST
औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरूणाने बलिदान दिले. तसेच पोलीस हवालदार शाम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ; सकल मराठा मोर्चाची मागणी
ठळक मुद्देमागण्यांची दखल न घेतल्यास १० कार्यकर्त्यांंसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा