पदकविजेत्यांचा सत्कार

By Admin | Updated: June 30, 2017 03:43 IST2017-06-30T03:43:58+5:302017-06-30T03:43:58+5:30

काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या २२ व्या दक्षिण आशियाई निमंत्रित कराटे स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४० खेळाडूंचा सत्कार परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Felicitated medal winners | पदकविजेत्यांचा सत्कार

पदकविजेत्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या २२ व्या दक्षिण आशियाई निमंत्रित कराटे स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४० खेळाडूंचा सत्कार परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी महाराष्ट्र राज्य अंतर्गत डिफेन्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीद्वारा निगडी प्राधिकरणात हा सत्कार सोहळा झाला. उपायुक्त शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय संघाचे प्रशिक्षक अरविंद मोरे, सुरेश माने, संजय साळुंखे, साईनाथ मलकेकर, सोनाली बडवे, आरती साळुंके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केले. सूत्रसंचालन हिमाली वहाळकर यांनी केले. आभार राकेश यादव यांनी मानले. काठमांडू येथील स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगला देशातील १८०० स्पर्धक सहभागी झाले होते. भारताने पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि २९ कांस्य अशी एकूण ४० पदके जिंकत वर्चस्व गाजविले.

Web Title: Felicitated medal winners