शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:54 IST

दुचाकीचालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला...

- औदुंबर पाडुळे

निगडी (पुणे) : त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर शनिवार पाठोपाठ मंगळवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देखील भीषण अपघात झाला. १२ वर्षीय मुलासह जात असलेला दुचाकीचालक डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा थोडक्यात बचावला. नवनाथ भानूदास गायकवाड (वय ४०), असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. दीपक नवनाथ गायकवाड (१२, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) असे अपघातात बचावलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड हे त्यांचा मुलगा दीपक याच्यासह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नवनाथ हे दुचाकीवरून खाली पडून डंपरसोबत शंभर मीटर अंतरापर्यंत फरपटत गेले. यात डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी मुलगा दीपक हा दुसऱ्या बाजूला पडल्यामुळे या अपघातातून बचावला. 

अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्त्यावरील रक्ताचे डाग धुवून काढले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. 

चौथा भीषण अपघात

गेल्या काही दिवसांपासून त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर अपघतांची मालिका सुरू आहे. लगोपाठ होणारा हा चौथा अपघात आहे. गेल्या आठवड्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांनी ‘रास्ता रोको’ करून आंदोलन केले होते. सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अपघात होऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातnigdiनिगडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड