कुसगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: September 13, 2015 01:38 IST2015-09-13T01:38:15+5:302015-09-13T01:38:15+5:30
पवन मावळ विभागातील कुसगाव येथील राजाराम गजानन वायंडेकर (वय ३८) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. राजाराम वायंडेकर यांना तातडीने

कुसगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या
तळेगाव दाभाडे : पवन मावळ विभागातील कुसगाव येथील राजाराम गजानन वायंडेकर (वय ३८) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. राजाराम वायंडेकर यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी दाखल केले. मात्र, औषधोपचारा दरम्यान शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.(वार्ताहर)