शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चेकवरची खोटी सही खरी भासवून मामा-भाच्याची ७७ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:04 IST

फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत होते जॉईंट अकाऊंट..

ठळक मुद्दे आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : चेकवर केलेली खोटी सही खरी भासवून, कुठलीही माहिती न देता मामा आणि भाच्याचा विश्वासघात करुन तब्बल ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अविनाश सुधाकर थिटे (वय २९, रा. पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रमेश खारोळे व अर्चना अमोल खारोळे (दोघेही रा. च-होली खुर्द, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी व त्याचे मामा यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन मे. खारोळे पाटील मँन्युफ्रँक्चरींग इंडस्ट्रीज ओपीसी प्रा.लि धानोरे, खेड या कंपनीत तसेच स्टीलनेटिक इंडस्ट्रीज प्रा.लि कंपनी सुरु केली. यात फिर्यादी व त्यांचे मामा यांना समान भागीदार करुन विकसनासाठी त्यांच्याकडून ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना आरोपींनी कुठलाही मोबदला न दिला नाही. याविषयी फिर्यादींनी आरोपीला विचारणा केली असता त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले.  ‘तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो. तुमची भागीदारी काढून घ्या’ असे सांगून प्रत्यक्षात फिर्यादींना पैसे दिले नाही. अशाप्रकारे आरोपींनी विश्वासघात करुन फसवणूक केली. तसेच फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत जॉईंट अकाऊंट होते. त्या संबंधित बँकेंच्या चेकबुकवर खोटी सही करुन ती बँकेत खरी भासवून आरोपीने  ‘सिंगल पर्सन सिग्नेचर अथॉरिटी’ असलेल्या एका बँकेतील अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस