शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणारा तोतया एसीपी पोलिसांच्या जाळ्यात; असा लागला पोलिसांच्या गळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 19:01 IST

टोल नाक्यांवर टोलचे पैसे न देता त्याने शासनाची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न

पिंपरी : चारचाकी वाहनातून विनामास्क फिरत असल्याने वाहतूक पोलिसांनी चाैकशी केली. त्यावेळी बनावट ओळखपत्र दाखवून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे सांगितले. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याची तोतयेगिरी उघडकीस आली. जाधव सरकार चाैक, स्पाईन रोड, चिखली येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी हा प्रकार घडला.  प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय ३३, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा), असे आरोपीचे नाव आहे. निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सुनील शिवाजी गायकवाड (वय ४०) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

फिर्यादी जाधव सरकार चौकात वाहतूक नियमन तसेच विनामास्क वाहनचालकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनातील दोघांनी मास्कचा वापर केला नसल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चारचाकी वाहन थांबवून कारवाई करण्यास सुरवात केली. त्यावेळी चारचाकी वाहनात आरोपी सूर्यवंशी होता. मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर (एसीपी) मी कार्यरत आहे, अशी बतावणी आरोपी सूर्यवंशी याने केली. तसेच फिर्यादी यांना त्याचे बनावट ओळखपत्र दाखवले. 

तोतया एसीपीचा भांडाफोड केल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे, उपनिरीक्षक एस. एस. राऊत, पोलीस कर्मचारी सुनील गायकवाड, कुर्मदास दहिफळे, लक्ष्मण कोल्हे, शंकर कशाळे यांचा विशेष सत्कार केला. तसेच त्यांच्या पथकाला बक्षीस जाहीर केले.  

फोटोतील ‘स्टार’मुळे संशय...

आरोपी सूर्यवंशी याने दाखविलेल्या ओळखपत्रावरील फोटोत त्याच्या खांद्यावर राजमुद्रा व स्टार दिसले. त्यावरून आरोपीने सांगितलेले पद आणि त्याच्या खांद्यावरील स्टार यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे ओळखपत्र बनावट असल्याची फिर्यादी गायकवाड यांना शंका आली. त्यानंतर कुदळवाडी पोलीस चाैकीत नेऊन चाैकशी केली असता, आरोपी याने एसीपी असल्याचे बतावणी केल्याची कबुली पोलिसांना दिली.  तसेच टोल नाक्यांवर टोलचे पैसे न देता त्याने शासनाची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी