शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य औषधे;सांगवीच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:54 IST

सांगवीच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार

पिंपरी : सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहात प्रसूत झालेल्या महिलांसाठी चक्क मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याचे समोर आले आहे. कोविड काळात वापरली जाणारी कोव्हिशिल्ड लस तसेच इतर काही मुदतबाह्य औषधे रुग्णालयातील कपाटात आढळून आली आहेत. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहात मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेकर, अलेक्झांडर मोझेस व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन अचानक भेट दिली. त्यावेळी कोविड काळात वापरल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लस आढळून आल्या. प्रसूत झालेल्या महिलांना ड्रेसिंग करण्यासाठी मुदतबाह्य बेटाडीन व इतर औषधे वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सांगवी येथील रुग्णालयात गोंधळ उडाला.महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर औषधांची खरेदी केली जाते. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. मात्र, तरीही मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नदरम्यान, याबाबत वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे मनसेचे कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी औषधांच्या बाटल्यांवरील स्टिकर्स फाडून टाकले. दुसऱ्या दिवशी बायोमेडिकल वेस्ट घेऊन जाणाऱ्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मुदतबाह्य औषधे सापडल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू साळवे यांनी केला आहे. 

हा सर्व प्रकार संशयास्पद असून मुदतबाह्य औषधे वापरल्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी. - राजू साळवे, शहर उपाध्यक्ष, मनसे. याबाबत तक्रार आली आहे. त्यासाठी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. ते तपासणी करतील. चौकशीअंती नेमका काय प्रकार आहे, तो समोर येईल. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे