शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीसाठी २८२८ उमेदवारांची ‘लेखी’; परीक्षेसाठी १६१ जण गैरहजर : २६२ जागांसाठी भरती

By नारायण बडगुजर | Updated: August 10, 2024 19:52 IST

या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरतीची लेखी परीक्षा शनिवारी (दि. १०) सकाळी दहा ते दुपारी साडेबाराच्‍या दरम्‍यान ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे पार पडली. पात्र ठरलेल्या २९८९ उमेदवारांपैकी प्रत्यक्ष २८२८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी हजर होते. लेखी परीक्षेसाठी १६१ उमेदवार गैरहजर राहिले. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला १८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त ४, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलिस पाल्य ७, गृहरक्षक दल १३, अनाथ ३ पदे राखीव आहेत. भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.

पोलिसांचे चोख नियोजन

लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी - चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले होते. परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

परीक्षार्थींच्या राहण्याची सोय

लेखी परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून उमेदवार पिंपरी - चिंचवड शहरात दाखल झाले होते. काही उमेदवार शुक्रवारी रात्री परीक्षा केंद्रावर आले. ३५० उमेदवारांची राहण्‍याची सोय पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे केली होती. शनिवारी सकाळी या उमेदवारांना चहा-नाश्ता देखील देण्यात आला.

साडेसहाशे पोलिसांचा फौजफाटा 

लेखी परीक्षेसाठी चार पोलिस उपायुक्त, नऊ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३१ पोलिस निरीक्षक, १३३ सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ४४४ पोलिस अंमलदार आणि २० वार्डन असा बंदोबस्त लावण्यात आला होता.

लेखी परीक्षेसाठी २९८९ उमेदवार पात्र

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील २६२ जागांसाठी राज्यभरातून १५ हजार ४२ अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी २९८९ उमेदवार पात्र ठरले. उर्वरित १२ हजार ५३ उमेदवार मैदानी चाचणीमधून बाहेर पडले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड