शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

दरवर्षी निर्बीजीकरणावर लाखोंचा चुराडा, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:09 IST

कुत्रे चावून जखमी होण्याच्या प्रमाणात वाढ; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देमहापालिकेचा खर्च वाया

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर लाखोंचा खर्च होत असून, कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे खर्च वाया जात आहे. गेल्या चार वर्षांचा आढावा घेतल्यास कुत्र्यांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे. कुत्रे चावून जखमी होण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असला तरी नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी महापालिकेचा वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय विभाग सजग नसल्याचे दिसून येत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत.  -कोणतीही घटना घडली की महापालिका प्रशासनास जाग येते, तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. याचा फटका सामान्यांना बसत आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका रुपीनगरातील लहानग्यांना बसला. पिसाळलेल्या कुत्र्याने पंचवीस जणांचा चावा घेतला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. त्यातून प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.भटक्या कुत्र्यांमुळे जीवन असह्य१भटक्या कुत्र्यांची शहरातील विविध भागांत दहशत सुरू आहे. रात्री शहरातील गल्ल्यांमध्ये कुत्री टोळ्यांनी फिरतात. रस्त्यावरून येणाºया जाणाºयांच्या अंगावर धावून जातात. दुचाकीवरून जाणाºया चालकांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्री रस्त्यांवरून चालणे अवघड झाले आहे. कुत्र्यांची दहशत कमी करण्यात महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला अपयश आले आहे.२मुले, शालेय विद्यार्थी सायकल, तसेच बाईकस्वार, कचरा गोळा करून उपजीविका चालविणारे लोक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. वाढत्या संख्येमुळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, तसेच लहान मुलांना कधीही ही कुत्री चावण्याची भीती निर्माण झाली आहे. रात्री-अपरात्री ही भटकी कुत्री वाहनांच्या, त्यातही दुचाकींच्या वाहनांच्या आडवे येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची संख्यादेखील वाढली आहे. ३ विविध इमारती, तसेच संकुलाच्या शेजारील कचराकुंडीमधील कचरा सर्वत्र पसरवून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यातूनच नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संस्था, संघटना, अनेक मंडळांतर्फे  महापालिका प्रशासन, तसेच पशुवैद्यकीय विभागाला निवेदन दिले, तक्रारी केल्या. परंतु, प्रशासन अगदीच ढिम्म झाले आहे. ४विविध संस्थांच्या माध्यमातून हे काम केले आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य, औषधे, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था, इंधन आदींसाठी येणारा खर्च संबंधित संस्थांद्वारे करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत मार्च २०१४ ते एप्रिल २०१९ या कालावधीत ६७ हजार ९७२ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे............लसीचा तुटवडा ४महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची खरेदी भांडार विभागाच्या अख्यत्यारित असून रेबीज लसीचा तुटवडा आहे. याचे कारण म्हणजे लस निर्मिती करणाºया संस्थांना कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादन थांबले आहे. त्यामुळे मागणी करूनही पुरवठा होत नाही. महापालिकेने लसपुरवठा करणाºया संस्थासाठी निविदा काढली होती. त्यानुसार चार हजार इंजेक्शनची मागणी केली होती. दोनदा मागणी करूनही साडेतीन हजार लसीचा पुरवठा झाला आहे. वाढीव मागणी केली आहे. परंतु पुरवठा झालेला नाही. असे महापालिका प्रशासनाचे म्हणने आहे. ...........हाफकीनकडून घेणार लस ४लस निर्मिती थांबल्याने रेबीज लसीची निविदा करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. लस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर निविदा उघडणे, दर स्वीकृती, दरांना स्थायी समितीची मंजुरी, त्यानंतर कार्यारंभ आदेश दिला जातो. यामध्ये वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसीचा तुडवडा निर्माण झाला होता. परिणामी नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे महापालिका लस खरेदीच्या पर्यायी स्रोतांचा विचार करीत आहेत. आता महापालिकेच्या वतीने हाफकीन कडून लस घेण्यात येणार आह.............मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २४ डिसेंबर २००१ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतर महापालिकेने आॅक्टोबर २०११ मध्ये शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू केली होती. कुत्र्यांची वाढती संख्या आणि सध्या असलेली यंत्रणा ही कमी असल्याने मोहिमेत अडथळे येत आहे. दोन संस्थांना नसबंदीचे काम दिले आहे. संबंधित संस्था कुत्र्यांना पकडून नेहरूनगर येथे आणले जाते. तिथे शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर रेबीजची लस देण्यात येते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत ज्या भागातून कुत्रा आहे. तिथेच सोडले जाते. वर्षाला १२ हजार कुत्र्यांना नसबंदी केली जाते. एका कुत्र्यासाठी ६९३ रुपये खर्च येतो. ८३ लाख १ हजार ६०० खर्च येत आहे. लाखो रुपयांचा खर्च होऊनही निर्बीजीकरणाचा उद्देश सफल झालेला दिसत नाही. ...........कुत्री चावण्याचे प्रमाण वाढले४भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जखमी झालेल्या नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात मोफत रेबीजची लस दिली जाते. त्यामुळे महापालिका रुग्णालयात उपचार घेणाºयांचीच आकडेवारी महापालिका गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास २०१६ ते २०१८ या वर्षांत सुमारे चार हजार कुत्री चावण्याच्या घटना घडल्या आहेत. ............ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdogकुत्राHealthआरोग्य