अवकाळीने शहराला झोडपले

By Admin | Updated: March 3, 2016 01:31 IST2016-03-03T01:31:39+5:302016-03-03T01:31:39+5:30

विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी पिंपरी-चिंचवड तसेच मावळ परिसरातील नागरिकांना झोडपले.

Ever remembered the city | अवकाळीने शहराला झोडपले

अवकाळीने शहराला झोडपले

पिंपरी : विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने बुधवारी दुपारी पिंपरी-चिंचवड तसेच मावळ परिसरातील नागरिकांना झोडपले.
पिंपरी-चिंंचवडसह मावळ, तसेच मुळशी परिसरात अवकाळी पाऊस झाला. सकाळपासूनच हवामानात उकाडा जाणवत होता. दुपारी बारानंतर आकाशात ढग जमायला सुरूवात झाली. तीनच्या सुमारास ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट सुरू झाला. वीजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर सुसाट वारा वाहू लागला. जोरदार पाऊस सुरू
झाला. अचानकपणे आलेल्या पावसाने दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. तासभर पाऊस पडत होता. सहाच्या सुमारास ढगाळ वातावरण निवळले.
जोरदार वारा, पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणचे फ्लेक्स आडवे झाले. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतूक संथ झाली होती. काही ठिकाणी वीज गेल्याने सिग्नल बंद पडले होते. यामुळे वाहने एकमेकांना धडकून छोटे-मोठे अपघात झाले. फुगेवाडी येथे अचानक मिनीबस थांबल्याने मागून येणाऱ्या मोटार व टेम्पोने धडक दिली. यामुळे वाहतूककोंडीत भर पडली.
जोरदार पावसामुळे अनेक सकल भागात गुडघाभर पाणी साचले. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीज खंडित झाली. विजेचा लंपडाव दिवसभर सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील
बीआरटी थांब्यात त्यांनी आश्रय घेतला. थांब्याभोवती दुचाकींची गर्दी झाली होती. सायंकाळी वातावरणात गारवा होता.(प्रतिनिधी)

Web Title: Ever remembered the city