शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना महामारीतही पिंपरीत लाचखोरी जोऱ्यात; पोलिसांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:25 IST

शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर वाढले प्रमाण....

नारायण बडगुजर - 

पिंपरी : कोरोनाचे महासंकट ओढावलेले असतानाही काही सरकारी, निमसरकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारत असल्याचे समोर आले आहे. कारवाई केल्यानंतरही हे प्रकार कमी झालेले नाहीत. विशेष म्हणजे यात पोलीस सर्वांत पुढे आहेत. त्यातही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांची लाचखोरी वाढली आहे.

कोरोनामुळे सर्व घटक आर्थिक संकटात आहेत. जीवनमरणाचा प्रश्न असल्याने अनेकजण घर-शेत विकून, गहाण ठेवून दागिने मोडून तसेच हातउसने व व्याजाने पैसे घेऊन उपचार घेत आहेत. अशा संकटांत सापडलेल्या सामान्य नागरिकांना काही जण ओरबाडत आहेत. त्यांच्याकडून पैसे उकळून मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून बेड उपलब्ध करून देण्यासाठी तसेच औषधांचा काळबाजार करून पैसे उकळण्यात येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये लाचलुचपत विभागाकडून सापळा रचून कारवाई करण्यात येते. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द व मावळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ ते मे २०२१ या कालावधित ४१ सापळा कारवाया केल्या. आरटीओ, वनविभाग, नोंदणी विभागाचे दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख, विधी व न्यायालय विभाग, जलसिंचन विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद या विभागांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी काही प्रकरणांत खासगी इसमांच्या मदतील लाचेची मागणी करून लाच स्वीकारली. 

पोलीस आयुक्तालय आहे की, लाचखोरीचे ‘कुरण’?शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी १५  ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. मात्र त्यानंतर लाचखोरीचे प्रमाण वाढले. त्याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यामुळे तब्बल १७ कारवाया करण्यात आल्या. शहरातील गुन्हेगारी कमी करण्याच्या नावाखाली सामन्यांना नाडण्याचा हा उद्योग पोलिसांकडून सुरूच आहे. कोरोना महामारीत जीवावर उदार होऊन ड्यूटी बजावणाऱ्या प्रामाणिक पोलिसांचे कौतुक होत असतानाच भ्रष्ट पोलिसांमुळे आयुक्तालय आहे की, लाचखोरीचे कुरण, असा सवाल केला जात आहे. 

कोणत्या वर्षात किती कारवाया२०१८ - १२२०१९ - १२२०२० - ११२०२१ (मेपर्यंत) - ६

कोरोना काळात पोलिसांची वरकमाई जोरातमहसूल – ५महावितरण - ५पोलीस – १७महापालिका – २पंचायत समिती – ३ जिल्हा परिषद – १वनविभाग - १इतर - ७

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस