शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सत्तांतरानंतरही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा, महापालिका कारभाराची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 02:00 IST

महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे

पिंपरी : महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. राष्टÑवादी काँग्रेसला नाकारून नागरिकांनी सत्तेची सूत्रे भाजपाच्या हातात दिली. वर्षभराच्या काळात विकास झाल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर जाहीरनाम्यातील ‘अच्छे दिन येणार कधी?’ याची प्रतिक्षा कायम असल्याचा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.महापालिकेची निवडणूक होऊन निकाल लागला. पंधरा वर्षे असणारी राष्टÑवादीची एकमुखी सत्ता नाकारून नागरिकांनी भाजपाला कौल दिला. त्यास वर्ष होत आहे. वर्षभराच्या कारभाराविषयी भाजपा समाधानी असून, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. विकास झाला असून, पारदर्शक कारभार व महापालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे सुविधांसह उपाययोजना करीत असल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर सत्ताधारी नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी दिशाभूल केली. शास्तीकरात माफी, भ्रष्टाचार व भयमुक्त कारभाराचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.भाजपाने एका वर्षात शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. समाविष्ट गावांना निधी दिला आहे. वीस वर्षांत समाविष्ट गावांत जेवढी कामे झाली नव्हती, तेवढी आम्ही वर्षात केली आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. मेट्रोचे काम वेगात सुरू असून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला चालना दिली.स्मार्ट सिटीच्या कामांनाही गती आली आहे.- नितीन काळजे, महापौरविकासाची वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पारदर्शक कारभार आणि चुकीची कामे, प्रथांना आळा घातला. आर्थिक शिस्त लावली. तसेच पालिकेचे उत्पन्न वाढविणे, नागरिकांना सक्षमपणे नागरी सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळणार आहे. समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे. कोणत्याही विकासकामांना विरोध म्हणून काही लोक टीका करतात. ही भूमिका योग्य नाही.- लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजपासत्ताधारी भाजपची एक वर्षाची कारकीर्द भ्रमनिरास करणारी ठरली आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड त्यांनी तोडले आहेत. सत्ताधाºयांना नागरिकांचा विसर पडला आहे. ते मूलभूत सुविधा पुरवू शकले नाहीत. विकासकामे करण्यापेक्षा केवळ निविदा काढण्यावरच भर आहे. पारदर्शकतेचे आश्वासन हवेत विरले आहे. जुन्याच प्रकल्पाचे नारळ फोडण्यात धन्यता मानत आहेत. मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत.- योगेश बाबर, शहरप्रमुख, शिवसेनाभाजपा केवळ घोषणा देणारा पक्ष ठरला आहे. वर्षभरात ते केवळ राष्ट्रवादीच्या प्रकल्पांचेच भूमिपूजन करीत आहेत. निवडणुकीत भाजपने केवळ घोषणा दिल्या. कृती मात्र शून्य आहे. भाजप एक वर्षात संपूर्णपणे अपयशी ठरला आहे. जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. सत्ताधाºयांचे भ्रष्टाचाराचे धोरण कायम आहे. भाजप केवळ मार्केटिंग करण्यात पटाईत आहे. वर्षभरात त्यांनी एकही काम पूर्ण केले नाही.- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्टÑवादीमहापालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. वर्षभरात नागरिकांची दिशाभूल करण्यात धन्यता मानली आहे. विकासाचे स्वप्न दाखविले ते पूर्ण करण्याऐवजी पाणी महाग करण्याचा घाट घातला जात आहे. ४७ कोटी वाचविल्याचा दावा सत्ताधारी करतात. मग तेच वळवा पाणी पुरवठ्यावरील खर्चात. नागरिकांवर भार कशासाठी दिला जातो? हेच का अच्छे दिन? - सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड