महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण
By Admin | Updated: July 11, 2016 00:36 IST2016-07-11T00:36:46+5:302016-07-11T00:36:46+5:30
मोटारसायकल वरील दोन चोरट्यांनी लग्न समारंभावरून परतणाऱ्या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार व नेकलेस असा

महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण
तळेगाव दाभाडे : मोटारसायकल वरील दोन चोरट्यांनी लग्न समारंभावरून परतणाऱ्या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार व नेकलेस असा २२ तोळे सोन्याचे सुमारे साडेचार लाख रूपये किमतीचे दागिने हिसकावून घेवून पोबारा केला. ही घटना वर्दळीच्या तळेगाव स्टेशन चौकात रविवारी भरदिवसा घडली. या घटनेमुळे पोलीसांच्या कार्यक्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात मंगल सूर्यकांत शेटे (वय ४७ रा. भुईज, ता. वाई, जि. सातारा) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगल शेटे या सातारा येथून आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी तळेगावला आल्या होत्या. वडगाव मावळ येथून लग्नसमारंभ आटोपून त्या तळेगाव स्टेशन चौकात आल्या. तेथील एका दुकानातून नारळ घेवून त्या रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरून दोघे चोरटे आले.
काही कळायच्या आत मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील १२ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, ५ तोळ्याचा राणीहार, ५ तोळ्याचे नेकलेस हिसकावले व मोटारसायकलवरून वडगाव फाट्याकडे पलायन केले. हा प्रकार आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. मंगल शेटे यांनी आरडाओरडा केला. चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले.
विशेष म्हणजे घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर टॅफिक
पोलीस वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते. दोन्ही चोरटे हे २५ ते ३० वयोगटातील असून त्यांनी काळ्या रंगाचे जर्कीन व जर्किनची टोपी घातली होती. मंगळसूत्र चोरट्यांची येथील खंड पडलेली मालिका
पुन्हा सुरू होवू नये अशी
नागरिकांची अपेक्षा आहे. चोरट्यांचा शोध घेणे पोलीसांपुढे एक आव्हान बनले आहे. (वार्ताहर)