संकेतस्थळावर माहिती द्या

By Admin | Updated: March 21, 2017 05:10 IST2017-03-21T05:10:00+5:302017-03-21T05:10:00+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांचे करार तसेच बोर्डाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या

Enter information on the website | संकेतस्थळावर माहिती द्या

संकेतस्थळावर माहिती द्या

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विभागांतील कामांसाठी नेमलेल्या ठेकेदारांचे करार तसेच बोर्डाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या सर्व विकासकामांचे, कामांचे तसेच विविध वार्षिक ठेक्यांचे आदेश सामान्य जनतेच्या माहितीसाठी तसेच पारदर्शक कारभारासाठी सूचनाफलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांतील नागरिक विविध करांच्या रूपाने मोठ्या प्रमाणात निधी जमा करीत आहेत. दरमहा अगर दोन महिन्यांनी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लाखो रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाते. मात्र कामे कधी सुरु होतात व कधी पूर्ण होतात, याचा थांगपत्ता लागत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. बोर्डाकडून विविध विभागांच्या मार्फत विविध विकासकामे, दुरुस्ती व देखभाल, देण्यात आलेले विविध ठेके त्यांची माहिती, ठेकेदारांना देण्यात आलेले कामांचे आदेश, त्यांच्याशी करण्यात आलेले करार, कामाची रक्कम, कामाची मुदत, संबंधितांची जबाबदारी आदी बाबींची सविस्तर माहिती नागरिकांना समजत नाही. त्यामुळे कामाचे आदेश प्रसिद्ध केल्यास कोणत्या वॉर्डात काय काम सुरु झाले आहे, याची सविस्तर माहिती मिळाल्यास त्यावर दर्जेदार काम होण्यासाठी अंकुश ठेवणे जागरूक नागरिकांना शक्य होऊ शकते. तसेच मोठ्या रकमेच्या कामांच्या ठिकाणी कामाबाबतची संपूर्ण माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक करावे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Enter information on the website