शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 11:32 IST

नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे...

पिंपरी : नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे. कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. महापौर उषा ढोरे अध्यस्थानी होत्या.सभेच्या सुरुवातीला संत तुकारामनगर प्रभागातील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी एक अनुभव सांगितला. प्रभागातील कामे होत नाहीत. अधिकारी कामाला टाळाटाळ करतात. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अभियंत्याने कॉल रेकॉर्ड केला. तो कॉल प्रभागातील दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवला, असे कृत्य करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.नगरसेविका आशा शेंडगे यांनीही अनुभव विशद केला. दापोडी प्रभागात विकासकामे सुरू आहेत. त्याची कोणतीही माहिती स्थानिक नगरसेवकांना दिली जात नाही. ठेकेदाराकडून दादागिरीची भाषा केली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. तर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना द्या, अशी सूचना महापौरांना केली.महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला आयुक्तांनी तत्काळ निलंबित करावे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsuspensionनिलंबनMayorमहापौरshravan hardikarश्रावण हर्डिकर