शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:42 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरूण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे.

ठळक मुद्देविनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत

पिंपरी : निगडी ओटास्किम येथील रहिवासी असलेला अनुप नवनाथ सोनवणे (वय. २८) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला तरूण गुन्हेगारीकडे वळला असुन तो चक्क पिस्तुल विक्रीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा साथीदार अवधूत जालिंदर गाढवे हा हॉटेल व्यवसायिक असून गुन्हेगारी कृत्यांत आघाडीवर आहे. या दोघांकडे विक्रीसाठी आणलले देशी बनावटीचे सात पिस्तुल आणि १५ काडतुसे आढळुन आली. १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. दोघांचीही यापुवीर्ची गुन्हेगाारी पार्श्वभूमी आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुकत मकरंद रानडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अतिरिकत आयुक्त रानडे म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरूण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे. त्याच्यावर विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर किनी गावचा आहे. त्याच्या निगडी येथील घराची झडती घेतली असता चार पिस्तुल आणि ८ जिवंत काडतुसे आढळुन आली. त्याच्याकडे अधिक चौकशीत त्याने मोशी येथील अवधुत जालिंधर गाढवे या साथीदाराचे नाव सांगितले. त्यास पिस्तुल विक्री केल्याची कबुली दिली. अनुपला ३१ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुपने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा साथीदार अवधूतला आळंदी परिसरातून ताब्यात घेतल्यावर त्याने अनुप कडून दोन पिस्तुल खेरदी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर आळंदी केळगावजवळ पिस्तुलाची चाचणी घेतल्याचेही नमूद केले. जालिंधरचा हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुवीर्ही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार आरोपी होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यास २८ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली आहे.  गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गनु्हे शाखेचे पोलीस निरीक ब्रम्हानंद नायकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, दिपाली मरळे, पोलीस हवालदार वेताळ, कैलास बाबडे,प्रमोद लांडे,राजेंद्र शेटे,प्रविण दळे, राजेश परंडवाल,आप्पासाहेब कारकुउ, महादेव धनगर, दिलीप लोखंडे, अमित गायकवाड, तानाजी गाडे, संतोष बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक