शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: इंजिनियरची गळफास घेऊन आत्महत्या, देहूगावमधील घटना

By नारायण बडगुजर | Updated: September 7, 2023 18:57 IST

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना डघडकीस आली...

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन अभियंता तरुणाने आत्महत्या केली. माळीनगर, देहूगाव येथे बुधवारी (दि. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना डघडकीस आली.

नितीन चंद्रभान परदेशी (२४), असे आत्महत्या केलेल्या इंजिनियर तरुणाचे नाव आहे. त्यांचा भाऊ कैलास चंद्रभान परदेशी (२७, रा. माळीनगर, देहूगाव, मूळ रा. वैजापूर, जि. संभाजीनगर), यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास परदेशी हा एका खासगी कंपनीत इंजिनियर आहे. तो त्याच्या परिवारासह माळीनगर, देहूगाव येथे राहण्यास आहे. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ नितीन परदेशी हा देखील राहण्यास आला होता. इंजिनियर असलेला नितीन हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. 

रक्षाबंधननिमित्त कैलास यांची पत्नी आणि मुले गावी गेले. दिवसपाळी असल्याने कैलास हे बुधवारी कामावर गेले. रात्रपाळी असल्याने नितीन हा घरी एकटाच होता. त्यावेळी त्याने घरात गळफास घेतला. कैलास हे कामावरून सायंकाळी घरी आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे