मंकी हिलजवळ रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले, पाचवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:43 IST2017-11-01T05:42:42+5:302017-11-01T05:43:13+5:30
पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघात झाला.

मंकी हिलजवळ रेल्वे इंजिन रुळावरुन घसरले, पाचवी घटना
लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघात झाला.
घाट परिसरात रेल्वेचे अप, मिडल व डाऊन असे तीन मार्ग असल्याने या अपघाताचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसला, तरी पुणे-भुसावळ एक्सप्रेस व पुणे-कर्जत पॅसेंजर या दोन गाड्या उशिराने धावल्या. रेल्वेचे बँकर्स (इंजिन ढकलायला वापरले जाणारे यंत्र) आणि पाच इंजिन मिडल लेनवरून कर्जत स्थानकाकडे जात होते. त्या वेळी पहिले तीन इंजिन व्यवस्थित गेले, मात्र चौथे व पाचवे इंजिन हूक तुटल्याने रुळावरून घसरले.
पाचवी घटना
या अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसला, तरी मागील काही महिन्यांतील मंकी हिल भागात अपघाताची ही पाचवी घटना आहे. मिडल लाइन ही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली असून, रेल्वे रुळाचे काम झाल्यानंतर ती सुरु करण्यात येईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.