शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर व्यावसायिकांनी केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 02:23 IST

सांगवी फाट्यावरील समस्या; वाहतूककोंडी होऊन अपघाताचा धोका

सांगवी : रावेत-औंध बीआरटीएस मार्गावर सांगवी फाटा येथे फळ विक्रेते व इतर विक्रेत्यांकडून भर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडल्याने येथे वाहतुकीस अडथळा होत आहे. अपघाताचाही धोका वाढला आहे. महापालिकेकडून व पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भर रस्त्यात बस्तान मांडलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.विविध प्रकारचे घरगुती सामान व विविध प्रकारची फळे विकताना नेहमीच या रस्त्यावर जवळपास साठ ते सत्तर तीनचाकी रिक्षा लावून विक्रेते विक्री करताना दिसून येतात. यासाठी नागरिक मुख्य रस्त्यावर आपली वाहने उभी करून वाहतूक नियम धाब्यावर बसवून फळे आणि वस्तू खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावर संध्याकाळी पुण्याकडून वाकड व काळेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना रहदारीस अडथळा ठरून वेगात येणारी वाहने येथे थांबलेल्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादवेळेस येथे वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून येतात.त्यामुळे व्यावसायिक तात्पुरते पलायन करतात. पण पुन्हा आहे तीच परिस्थिती दिसून येते. महापालिका अशा व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही हे आश्चर्याची गोष्ट आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, वाकड आणि परिसरातील इतर मुख्य रस्त्यांवर असे विक्रेते कोणत्याही प्रकारची काळजी न घेता नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत.अनधिकृतपणे येथे विक्रेते व्यवसाय करताना दिसून येत आहेत. मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. येथे कायमस्वरूपी एक वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात यावा, अशीही मागणी आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.फळ विक्रेत्यांचे मुख्य रस्त्यावर बस्तानखडकी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर खडकी बाजार पीएमपी बस स्थानक ते बोपोडी चौकदरम्यान फळांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे संपूर्ण रस्त्याला फळ मार्केटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे व हातगाड्या रस्त्यामध्ये आल्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाची गाडी दिवसभर रिकामी खडकी बाजारातून फिरताना दिसते. मात्र कोणावरही कारवाई केली जात नसल्यामुळे अतिक्रमण विभागाचा उपयोग काय, असा सवाल खडकीकर करीत आहेत.महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडूनही दुर्लक्षमागील अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. तसेच या रस्त्यावर अतिक्रमणही वाढले आहे. पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या दोन्हींची हद्द या रस्त्याच्या माध्यभागापासून सुरू होते़ पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाकडूनही अतिक्रमण कारवाई करण्यात येत नाही.संयुक्त कारवाईची नागरिकांकडून मागणीखडकी बोर्डाच्या सुस्त कर्मचारी वा अधिकाºयांमुळे या रस्त्यावर समस्याच समस्या पहावयास मिळत आहेत. याकरिता पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात यावी व येथील अनधिकृत हातगाड्या हद्दपार करण्याची मागणी खडकी बोपोडीकरांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड