पदाधिकाऱ्यांच्या दौ-यावर उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:41 IST2018-04-12T00:41:49+5:302018-04-12T00:41:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दौ-यांवर अधिक भर दिला जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौ-यासाठी रवाना झाले आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या दौ-यावर उधळपट्टी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दौ-यांवर अधिक भर दिला जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौ-यासाठी रवाना झाले आहेत. १३ एप्रिलपर्यंत या दौ-याचा कालावधी आहे. या दौ-यात नगरसेविकांना विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी,
बाजारपेठेची पाहणी करून दिली जाणार आहे. दौ-यावर तीन लाखांचा खर्च होणार आहे.
महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य असणाºया नगरसेविकांसाठी केरळ येथे ८ ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीत अभ्यास दौरा आयोजित करण्याबाबत ३
एप्रिल २०१८ रोजी पत्राद्वारे कळविले आहे. या दौºयाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने ४ एप्रिल २०१८ रोजी पत्राद्वारे कळविले होते.
या दौºयामध्ये सहभागी नगरसेविकांना माहिती, शिक्षण आणि संवादांतर्गत विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी, बाजारपेठेची पाहणी, यशस्वी उद्योजकांची भेट व चर्चा आणि उद्योगांना अभ्यासभेटी, तसेच महिलांसाठी सरकारच्या आणि महापालिकेच्या विविध योजना राबवून महिलांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणे असा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार केरळ अभ्यास दौºयाचे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजन केले आहे. त्यासाठी
महिला व बाल कल्याण समितीच्या पाच सदस्या आणि संस्थेचा एक समन्वयक अशा प्रत्येकी सहा सदस्यांसाठी प्रतिव्यक्ती ५६ लाख रुपये खर्च होणार असून, सहा व्यक्तींसाठी एकूण तीन लाख ३७ हजार खर्चास मान्यता दिली आहे.
>पाहणी दौरे केल्यानंतर अहवाल
सादर करावा अशी सक्ती स्थायी समितीने केली होती. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. दौºयांवर होणारी उधळपट्टी रोखावी, अशी मागणी होत आहे.