शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महापालिका विषय समितीची आज निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 08:50 IST

 महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे.

पिंपरी :  महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. त्यानंतर सभापती निवड होणार असून, युतीधर्मानुसार शिवसेनेलाही सभापतिपदी संधी मिळावी, अशी मागणी होत आहे. यावर सत्ताधारी भाजपा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपद निवडणुकीत सत्ताधारी भाजपाची सरशी झाली. त्यानंतर चार विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. महिला आणि बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समिती अशा चार समिती सदस्यपदासाठी  २० मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया होणार आहे. गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या तौलनिक बलाबलानुसार बंद पाकिटात नावे द्यायची असून, सर्वसाधारण सभेत महापौर राहुल जाधव ही बंद पाकिटे फोडून सदस्यांची नावे जाहीर करीत असतात. महापालिका विधी समितीवर नऊ, महिला आणि बालकल्याण समितीवर नऊ, शहर सुधारणा समितीवर नऊ, कला आणि क्रीडा समितीवर नऊ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.विधी समितीतीत एकुण नऊ सदस्य असून पाच सदस्य हे सत्ताधारी भाजपाचे तीन हे राष्ट्रवादीचे तर एक सदस्य शिवसेनेचा असणार आहे.   महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समितीतीही हेच सूत्र असणार आहे. 

भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष महापालिकेतील विविध विषय समितींवरही भाजपाचेच वर्चस्व आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली आहे. त्यामुळे महापालिका सत्तेत वाटा मिळणार, अशी शिवसेनेला आशा आहे. याबाबत भाजपा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी होणाऱ्या  सर्वसाधारण सभेत सदस्यपदाची निवड केली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणBJPभाजपा