शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नदीला प्रदूषणाचे ग्रहण; इंद्रायणीचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:27 IST

पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे.

दिघी : पिंपरी-चिंचवडसह तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणीनदीला वाढत्या अस्वच्छतेने व प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले आहे. यातून आळंदी येथील नदीवरील पाणीसाठवण के. टी. वेअर बंधाऱ्याची गळती व साठवण बंधारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी पाणी साठवण क्षमतेवर मर्यादा आल्याने आळंदीत इंद्रायणी नदी कोरडी पडली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत असलेले आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींच्या मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. पिंपरी-चिंचवड शहर आणि आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. मात्र नदीत थेट सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतूनदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीत सांडपाणी व रसायन, मैलामिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. यामुळेदेखील नदीचे प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जलप्रदूषणाने नाराजी व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षाने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणाºया घटकांवर कारवाईच्याअभावी नदी प्रदूषण आळंदीसह नदीच्या परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणीपुरवठा केंद्रात येणारे पाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च सहन करावा लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.आळंदीत येणारे भाविक आणि वारकरी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मुक्काम करतात. अशा भाविकांनीही नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. आळंदीत पिण्याच्या पाण्याचे वितरण नलिकांसह पाण्याच्या टाक्यांची कामे देखील झाली आहे. उर्वरित कामे लवकरच होतील. याशिवाय सांडपाणी नलिकांची कामे सुरु आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेतर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. काही कालावधीत तीर्थक्षेत्र आळंदीच्या चेहरामोहरा बदललेला भाविक, नागरिकांना पाहण्यास मिळेल.इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने डी.पी.आर.देखील तयार केला आहे. राज्य शासनस्तरावरदेखील यासाठी काम सुरु आहे. या कामाला गती देऊन महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वारकºयांसाठी पवित्र असलेल्या या नदीचे रुपडे पालटण्यास मदत होईल.आरोग्य धोक्यात : पाणीही प्रदूषितपाणीदेखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगर परिषदेस पाणी शुद्धीकरणावर प्रचंड खर्च करावा लागत आहे. भाविक नागरिकांना नाहक जास्त खर्च करून पिण्याचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. आरोग्याची काळजी घेत नागरिकही स्वच्छ पिण्याचे पाण्यास प्राधान्य देत भुर्दंड सोसत आहेत.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीriverनदीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषण