शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टीकेनंतर मुख्यमंत्र्याविना सुरू होणार ई-बस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 21:24 IST

 पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत.

पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बस आणि सीएनजी बसचे उद्घाटन करण्याचे नियोजन पीएमपीने केले होते. पुणे आणि पिंपरीत टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांविनाच स्वांतत्र्यदिनापासून बस सुरू करण्यात येणार आहेत.  पीएमपीच्या ताफ्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बस मार्गावर धावत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंर्तगत एकुण ५०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १५० बसपैकी उर्वरीत १२५ बस १२ मीटर लांबीच्या आहेत. त्यापैकी ५० बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसचे लोकार्पण व्हावे, असा अट्टाहस पुण्यातील भाजपाचा होता. ह्यलोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने नवीन ई-बस, सीएनजी बस मार्गावर येऊ शकणार नाहीत, असे वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते. उद्घाटनसाठी नागरिकांना वेठीस धरीत असल्याची टीकाही झाली होती. त्यामुळे पीएमपी आणि सत्ताधाºयांवर मोठी टीका झाली होती. त्यामुळे पीएमपीने मुख्यमंत्र्यांची वेळेची वाट न पाहता, उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पिंपरीत कार्यक्रम पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड भागातील ई-बसेस व सी.एन.जी. बसेस  लोकार्पण कार्यक्रम गुरुवारी सकाळी पावणे नऊला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीत होणार आहे.  यावेळी महापौर राहूल जाधव यांच्यासह भाजपाचे आमदार आणि महापालिकेतील पदाधिकारी  आणि आयुक्त, श्रावण हार्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित राहणार आहेत.  स्थायी समितीचे सभापती  विलास मडिगेरी म्हणाले, १२५ पैकी पन्नास ई-बस आल्या आहेत. २० बस निगडीतील स्थानकात सज्ज आहेत. तसेच सीएनजीच्या एकुण बसपैकी ५७ बस आल्या असून त्यापैपिंपरी-चिंचवड शहरासाठी  वीस बस पिंपरी-चिंचवडसाठी असणार आहेत. या बससेवेची सुरूवात गुरूवारी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे