शेवटच्या दिवशी धुरळा!

By Admin | Updated: February 20, 2017 02:14 IST2017-02-20T02:05:36+5:302017-02-20T02:14:08+5:30

पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी १५0 गणांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे

Dust the last day! | शेवटच्या दिवशी धुरळा!

शेवटच्या दिवशी धुरळा!

पुणे जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी १५0 गणांसाठी
२१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. १३ फेबु्रवारीला माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यात उघड प्रचाराला सुरुवात झाली. यापूर्वी, गावभेटी, कोपरासभा घेऊन पक्षातील सर्वच इच्छुक मतदारांपर्यंत जात होते. माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर जाहीर सभा, रॅली व शक्तिप्रदर्शन करीत गेले आठ दिवस प्रचार सुरू होता. प्रचाराचा शेवटचा दिवस रविवारचा आल्याने जिल्ह्यात सर्वत्रच प्रचाराचा धुरळा उडाल्याचे दिसले. दिवसभर प्रचार केल्यानंतर तालुक्याच्या मुख्य ठिकाणी राज्यस्तरीय किंवा स्थानिक नेत्याने त्या-त्या पक्षाची सभा घेऊन प्रचाराची सांगता केली.  

Web Title: Dust the last day!