शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मावळात लढत दुरंगी! अपक्ष बापू भेगडे आणि राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांच्यात फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 22:12 IST

मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : मावळमध्ये विधानसभेसाठी एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर अर्ज माधारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत. बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. भेगडे यांची महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या नावावर फुली मारल्याचे स्पष्ट झाले होते. पण, भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढव असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीनेही उमेदवार न देता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेळके यांच्यासमोर भेगडे यांचे तगडे आव्हान असणार आहे.

यांनी घेतली माघार....विधान सुधीर तरफदार, दादासाहेब किसन यादव, रविंद्र आण्णासाहेब भेगडे, सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे, रूपाली राजेंद्र बोचकरी, संतोष राजन लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

मावळ विधानसभा:-

एकुण अर्ज - १८बाद अर्ज - ०६

वैध अर्ज - १२माघार - ०६

उमेदवार रिंगणात - ०६

पुरूष मतदार : १९६१८८महिला मतदार : १८७१२७

इतर : १३एकूण मतदार : ३८३३२८

टॅग्स :maval-acमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेस