शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोच्या कामामुळे पिंपरीत वाहनांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 19:36 IST

महामेट्रोकडून त्याकडे दुर्लक्ष करून काम दामटण्याचा प्रकार

ठळक मुद्देपिंपरीत डिसेंबर अखेर मेट्रोचा ट्रायल रन होणारप्रत्यक्ष प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोकडून प्रयत्न

पिंपरी : महामेट्रोच्या पिंपरी ते दापोडी या प्राधान्य मार्गाचे काम वेगात सुरू आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना महामेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून काम दामटण्याचा प्रकार महामेट्रोकडून सुरू आहे. त्यामुळे पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. २३) दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पिंपरीत डिसेंबर अखेर मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी दिवसा तसेच रात्रीही युद्धपातळीवर काम सुरू आहे. या मार्गावर खराळवाडी ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान सेगमेंटची जोडणी करून स्पॅन तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शनिवारी सकाळपासून या चौकात क्रेन तसेच इतर साधनसामुग्री आणून काम सुरू करण्यात आले होते. या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून चौकात तात्पुरते फायबरचे बॅरिकेडस् लावण्यात आले होते. तसेच वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन यांच्याकडून वाहतूक नियमन करण्यात येत होते. मात्र वाहनांची मोठी संख्या असल्याने चौकाच्या सर्वच बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी यात भर पडून वाहतूक कोंडी झाली होती. 

चौकात होणार दोन स्पॅनपिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन स्पॅन होणार आहेत. यातील खराळवाडीच्या बाजूच्या स्पॅनच्या सेगमेंटची शनिवारी क्रेनच्या साह्याने जोडणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. जोडणी झाल्यानंतर त्याची ह्यअलाइनमेंटह्ण करण्याचे काम रविवारी सकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो