महामेट्रोच्या कामामुळे पिंपरीत वाहनांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 06:33 PM2019-11-23T18:33:27+5:302019-11-23T19:36:01+5:30

महामेट्रोकडून त्याकडे दुर्लक्ष करून काम दामटण्याचा प्रकार

Due to the work of the Mahametro, the movement of vehicles in Pimpri | महामेट्रोच्या कामामुळे पिंपरीत वाहनांचा खोळंबा

महामेट्रोच्या कामामुळे पिंपरीत वाहनांचा खोळंबा

Next
ठळक मुद्देपिंपरीत डिसेंबर अखेर मेट्रोचा ट्रायल रन होणारप्रत्यक्ष प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोकडून प्रयत्न

पिंपरी : महामेट्रोच्या पिंपरी ते दापोडी या प्राधान्य मार्गाचे काम वेगात सुरू आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना महामेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून काम दामटण्याचा प्रकार महामेट्रोकडून सुरू आहे. त्यामुळे पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. २३) दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. 
पिंपरीत डिसेंबर अखेर मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी दिवसा तसेच रात्रीही युद्धपातळीवर काम सुरू आहे. या मार्गावर खराळवाडी ते पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान सेगमेंटची जोडणी करून स्पॅन तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शनिवारी सकाळपासून या चौकात क्रेन तसेच इतर साधनसामुग्री आणून काम सुरू करण्यात आले होते. या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून चौकात तात्पुरते फायबरचे बॅरिकेडस् लावण्यात आले होते. तसेच वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन यांच्याकडून वाहतूक नियमन करण्यात येत होते. मात्र वाहनांची मोठी संख्या असल्याने चौकाच्या सर्वच बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी यात भर पडून वाहतूक कोंडी झाली होती. 

चौकात होणार दोन स्पॅन
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन स्पॅन होणार आहेत. यातील खराळवाडीच्या बाजूच्या स्पॅनच्या सेगमेंटची शनिवारी क्रेनच्या साह्याने जोडणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. जोडणी झाल्यानंतर त्याची ह्यअलाइनमेंटह्ण करण्याचे काम रविवारी सकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले
 

Web Title: Due to the work of the Mahametro, the movement of vehicles in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.