शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:03 IST

इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल पावसामुळे पाण्याखाली गेला असून महत्वाच्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देलोणावळ्यात गेल्या दिवसभरात १५१ मिमी तर पवना धरण क्षेत्रात १३२ मिमी पाऊस पवना धरणात ३१.९२ टक्के पाणीसाठा

लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण क्षेत्रात १३२ तर लोणावळा शहरात १५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेला जोरदार पाऊस शुक्रवारी देखील कायम राहिला. त्यामुळे पवना धरणात ३१.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिवळे गावातील इंद्रायणी नदीवरील सांगिसे पूल पावसामुळे पाण्याखाली गेला असून महत्वाच्या आठ गावांचा संपर्क तुटला आहे. वडीवळे, सांगिसे, बुधवडी, वळकं, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी या आठ गावांना जोडणारा हा पूल असून या गावांचा दळणवळणाचा महत्वाचा मार्ग आहे. येथील अनेक भागात फुलांच्या कंपन्या व इतर उद्योगधंदे असल्याने मोठी मालवाहतूक वाहने या पुलावरून होत असते.पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने शनिवारी सकाळपासून मावळातील गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पुल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी , विद्यार्थी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने वारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना ९-१० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागले. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट वाढली आहे.त्याप्रमाणे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी लोणावळ्यात पर्यटन व वर्षाविहारा करिता येणाऱ्या पर्यटकांनी डोंगरभागात धबधब्याच्या खाली जाऊन बसण्याचे टाळावे, धरणांचा पाणीसाठा वाढलेला असल्याने पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करु नये, लायन्स पॉईट याठिकाणी पावसाच्या सोबतच धुके व हवा मोठ्या प्रमाणात असल्याने कोणीही सुरक्षा रेलिंगच्या पुढे दरीच्या टोकापर्यत जाऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

     

टॅग्स :lonavalaलोणावळाRainपाऊसDamधरणpavana nagarपवनानगर