शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक स्त्रोताच्या नष्टतेमुळे पाण्याचा वारसा संपतोय :  शशांक देशपांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:34 IST

भूजलाचा उपयोग, भूजल वापराबाबतची अनभिज्ञता यावर भाष्य करताना शहरी भागातील लोकांनी एकत्र येऊन भूजल साठवणुकीचे प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यावर भर दिला पाहिजे

पिंपरी-चिंचवड : शहरातील भूजलाचे पूर्ण शोषण झाले असून त्याचे अधिक शोषण करण्यास आता वाव नाही. जमिनीपासून कमी स्तरावर पाण्याचा जरी उपसा झाला तरी त्याचे दरवर्षी पुनर्भरण होऊन तो स्तर कायम राहतो. मात्र इंधन विहिरीतील (बोअरवेल) पाणी मात्र शेकडो वर्षांचे जुने असते तर अधिकाधिक खोल विहिरीतील पाणी हजारो वर्षांपूर्वीचे जुने असते. असा हा नैसर्गिक स्त्रोत आपण अत्यंत निष्काळजीपणे नष्ट करत असल्याने पुढील पिढीसाठी आपण कोणताही वारसा संपवतोय, ही खेदजनक बाब ज्येष्ठ भू-वैज्ञानिक शशांक देशपांडे यांनी वाकड येथे व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीज फेडरेशन आणि पिंपरी चिंचवड सिटिझन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७) भूजलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जलसंचयन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशपांडे बोलत होते. परिसंवादाद्वारे ज्येष्ठ भूजल संशोधक डॉ हिमांशू कुलकर्णी आणि वरिष्ठ भू-वैज्ञानिक शशांक देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत या विषयावरील विविध पैलूंचे विवेचन केले. यावेळी शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे, तुषार कामठे तसेच वाकड आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शंभरहून अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे निमंत्रक तुषार शिंदे यांनी पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश,पवना नदी शुद्धीकरण, मेट्रो प्रकल्प राबविण्यातील सकारात्मक भूमिका यांसारख्या प्रकल्पातील फोरमच्या योगदानाविषयी माहिती दिली.  कुलकर्णी म्हणाले, भूजलाचा उपयोग, भूजल वापराबाबतची अनभिज्ञता यावर भाष्य करताना शहरी भागातील लोकांनी एकत्र येऊन भूजल साठवणुकीचे प्रकल्प संयुक्तरित्या राबविण्यावर भर दिला पाहिजे. तसेच बदलते पर्जन्यमान आणि त्याचा भूजल साठवणुकीवर होणारा परिणाम यावर त्यांनी आपले मत मांडले. पूर्वी पावसाळ्याचे चार महिन्यातच नियमित वृष्टी होत असत पण दिवसेंदिवस निसर्ग आपले रूप पालटतो आहे. ते अत्यंत धोकादायक आहे.     सूत्रसंचालन सुधीर देशमुख यांनी केले तर आभार अरुण देशमुख यांनी मानले. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी