शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पिंपरीत बोगस वकिलांचा वाढलाय वावर, परप्रांतीय व्यक्तींच्या सहभागाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:35 AM

आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़

पिंपरी : आॅल इंडिया बार कौन्सिलकडे नोंदणी नाही़ वकिली व्यवसायाची सनद न मिळविता, राजरोसपणे न्यायालयात परिसरातील बोगस वकिली करणारे वकील संघटनेलाही शिरजोर झाले आहेत. वकिली व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे़ मात्र त्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी वर्तणूक करणाºया वकिलांचा वावर वाढत चालला आहे. पायात बुटाऐवजी चप्पल, कळकट, मळकट कपडे घालून काही परप्रांतिय व्यक्ती वकील म्हणून वावरतात. त्यांना हटकणाºया वकील संघटनेच्या पदाधिकाºयांनाही ते जुमानत नसल्याचे चित्र आहे.मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास एक परप्रांतिय व्यक्ती पिंपरी न्यायालयाच्या आवारात हातात कागद घेऊन फिरत होता. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बारचा सदस्य नसलेली ही व्यक्ती कळकट, मळकट गणवेशात, पायात चपला घालून वावरताना दिसून आली. त्या व्यक्तीस अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी हटकले. मात्र ‘‘मी बार कौन्सिलची सनद मिळवली आहे़ तुम्ही मला अडवू शकत नाही’’असे म्हणत हातातील कागद तो दाखवू लागला. सनद मिळवली असली तरी अशा पद्धतीने सनद हातात घेऊन फिरणे योग्य नाही. न्यायालयात येत असताना, गणवेश कसा असावा, पायात बूट असावेत, असा वकिली व्यवसायाच्या आचारसंहितेतील नियम आहे. निदान त्याचे तरी पालन करावे, असे अ‍ॅडव्होकेट बासर असोसिएशनचे अध्यक्ष किरण पवार यांनी त्याला समजून सांगितले.पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असाल तर या अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे सदस्य होता येईल, कोणत्याही ठिकाणी व्यवसाय करा, व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करणे आवश्यकच आहे. मात्र या महाशयांनी मला कोणी शहाणपण शिकवू नये, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला.- गतवर्षी शर्मा नामक एका व्यक्तीने अशाच पद्धतीने पिंपरीतील वकील संघटनेला नाकीनऊ आणले होते. या शर्माकडे तर आॅल इंडिया बार कौन्सिल अथवा बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ अशी कोणत्याच कौन्सिलची सनद नाही. तरीही तो राजरोसपणे न्यायालय परिसरात येत होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असून काही दिवसांसाठी तो तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे. या महाशयाने तर त्याला हटकणाºया पदाधिकाºयांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यापर्यंतची मजल मारली आहे. न्यायालयात ज्यावेळी मी बोगस वकील असल्याचे सिद्ध होईल, तेव्हाच मी न्यायालयात येणे बंद करेल, असे आव्हानच त्याने वकील संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले आहे.

टॅग्स :advocateवकिल