शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मावळ तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:31 IST

परतीच्या पावसाची हुलकावणी; दुष्काळ जाहीर करण्याची नागरिकांची मागणी, उत्पादन घटणार

वडगाव मावळ : मावळ तालुक्याची ओळख असलेल्या आणि आंब्याच्या मोहराप्रमाणे सुगंध असणारे भात हे मुख्य पीक आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादन २५ ते ३० टक्क्यापर्यंत घटले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. दुष्काळ जाहीर करावा, यासाठी सर्वच पक्षांनी मागणी केली आहे. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.भातपिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी मावळ तालुका हा अग्रेसर आहे. सुमारे १२ हजार हेक्टरवर भातपीक लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये ७० ते ८० टक्के इंद्रायणी, २० ते २५ टक्के फुले समृद्धी, आंबेमोहरचे प्रमाण खूपच कमी झाले असून, ते एक टक्क्यावर गेले आहे. या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यामुळे भातपीक जोमात येईल, या आशेने शेतकरी आनंदीत होते. परंतु परतीच्या पावसाने धोका दिल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या वर्षी अधिक पाऊस झाल्याचे शासकीय यंत्रणेकडे नोंद असली तरी भातपिकासाठी जो नंतर पडणारा पाऊस आवश्यक होता. तो न पडल्याने पिकाला मोठा फटका बसला आहे. डोंगर पठारावरील भातपीक सुकून गेले आहे. तर काही भागात खडकाळ शेती आहे. त्या भागातही मोठा फटका बसला आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतकरी दरवर्षी काहीशा प्रमाणात तांदूळ विकून घरातील वर्षभराचा खर्च भागवतात मात्र यावर्षी भातपिकातच निम्म्याने घट झाल्याने विकले तर घरी खायचे काय आणि नाही विकले तर वर्षाचा खर्च कसा भागवायचा या दुहेरी कात्रीत सापडले आहेत. मावळातील, कुसगाव, पुसाणे, चांदखेड, आढले बुद्रुक, जवण, दिवड, ओव्हाळे, जांभवली, थोराण, मोरमारवाडी, उकसान, पालेनामा, कोंडीवडे, ताजे, सदापूर या शिवाय तिन्ही मावळातील काही गावे दुष्काळसदृश्य स्थितीत आहेत.तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे म्हणाले, परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उत्पादनास फटका बसला आहे. मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या साठी सत्ताधारी भाजपा यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी केली तर बाळासाहेब नेवाळे यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढून मागणी केली.कधी दुष्काळ जाहीर करतंय याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.भात काढणीला आला वेगकार्ला : कार्ला परिसरात कार्ला, वेहेरगाव, भाजे, पाटण आदी परिसरात भात काढणीला चांगला वेग आला आहे. भात झोडणीही उरकून घेण्याची मानसिकता अलीकडच्या काळात शेतकºयांची दिसत आहे़ त्यात पावसानेही लवकर ओढ दिली आहे. भात काढून झाले की प्रत्येक शेतकरी शेतात कडधान्ये पेरीत असतो. पण त्याकरिता शेतात काहीशी ओल असण्याची आवश्यकता आहे. पावसाने लवकर ओढ दिल्याने शेतीची ओल वाढण्याची शक्यता कमी आहे़ लवकर भातकाढणी करून शेत लवकर पेरण्यासाठी शेतकºयांची धावपळ चालू आहे. पण यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कडधान्ये पेरायला शेतात ओल येते की नाही, याबद्दल शेतकºयांच्या मनात संभ्रम आहे आणि म्हणून लवकर भात काढणी करून जमले तर भातझोडणी करून शेत मोकळे करून पेरणी करण्यासाठी मोठी लगबग चालू आहे.

टॅग्स :droughtदुष्काळmavalमावळ