बंद बसमुळे चिंचवडला वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:58 IST2016-02-02T00:58:17+5:302016-02-02T00:58:17+5:30

पीएमपीएमएल’ बसचा टायर फुटल्याने नादुरुस्त झालेली बस तब्बल आठ तास उलटल्यानंतरही रस्त्यात न हटविल्याने चिंचवडमधील कै. बाबुराव गेणबा चिंचवडे चौकात

Due to the bus stop, Chinchwadla transporters | बंद बसमुळे चिंचवडला वाहतूककोंडी

बंद बसमुळे चिंचवडला वाहतूककोंडी

चिंचवड : ‘पीएमपीएमएल’ बसचा टायर फुटल्याने नादुरुस्त झालेली बस तब्बल आठ तास उलटल्यानंतरही रस्त्यात न हटविल्याने चिंचवडमधील कै. बाबुराव गेणबा चिंचवडे चौकात वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटयावर आला.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास चिंचवडगाव ते कात्रज (एमएच १४ सी डब्लू ३०२८) या क्रमांकाच्या बसचे पुढील चाक अचानक खराब झाले. चिंचवडे चौकात अचानक घडलेल्या घटनेत प्रसंगावधान दाखवत चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बस पूर्णपणे बाजूला घेता आल्याने बसचा काही भाग रस्त्यात होता. या प्रकाराची माहिती चालकाने संबंधित कार्यालयात दिली. त्यावेळी रस्त्यात बंद असणारी बस काढण्या साठी कर्मचारी पाठविले आहेत, असे उत्तर देण्यात आले. मात्र, बराचवेळ येथे कोणीही फिरकले नाही. या बंद पडलेल्या बसमुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. परिसरातील रहिवाशी या प्रकारामुळे संतप्त झाले. रात्री नऊपर्यंत बंद असणारी बस तशीच होती.
या बसचे चालक वारंवार कार्यालयाशी संपर्क साधत होते. मात्र, त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी
प्रयत्न करत होते. वारंवार संपर्क करूनही बस दुरुस्ती साठी
कोणीही येत नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. यावरुन प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले. ठेकेदारांच्या बस असल्याने अडचणी निर्माण होतात.
पीएमपी प्रशासनात अनेक ठेकेदारांच्या बस मार्गावर धावत असतात. या बस मार्गावर बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था केली जात नाही. अशा अनेक घटना वारंवार घडत असतात. या प्रकारा बाबत योग्य नियोजन करावे अशी नागरीकांची मागणी आहे.
दरम्यान पीएमपीच्या थांब्यामध्ये अनेक बस नादुरुस्त आहेत. केवळ त्या रस्त्यावरून कामापुरत्याच धावतात. या बस वाहतुकीसाठी पीएमपीने भाडेतत्त्वावर घेऊ नयेत अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यातच बस बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Due to the bus stop, Chinchwadla transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.