भाऊसाहेबांची रीतच न्यारी, सर्वसामान्यांना वेठीस धरी
By Admin | Updated: August 27, 2014 05:13 IST2014-08-27T05:13:34+5:302014-08-27T05:13:34+5:30
ग्रामसेवक भाऊसाहेबांना भेटायचंय.......? या प्रश्रावर उद्या या.... असेच उत्तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून मिळते. हा उद्या कधी संपतच नाही.

भाऊसाहेबांची रीतच न्यारी, सर्वसामान्यांना वेठीस धरी
ग्रामसेवक भाऊसाहेबांना भेटायचंय.......? या प्रश्रावर उद्या या.... असेच उत्तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून मिळते. हा उद्या कधी संपतच नाही. कधी मिटींग...कधी संप.... कधी शेजारच्या गावाला तर कधी तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात गेले आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे सामान्य नागरिकापासून विद्यार्थी व निराधार महीलांदेखील या भाऊसाहेबांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. वर्षानुवर्र्षे याच पद्धतीचा जाच सुरू आहे. बारामतीत बहुतांश कार्यालयात ग्रामसेवकच अनुपस्थित होते. पावसाची संधी साधून अनेक ग्रामसेवकांनी दांडी मारल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भोर तालुक्यात शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायती सोडल्या दुर्गम भागातील ग्रामसेवकांनी शहरात कार्यालये थाटलेली आहेत. आज मंगळवार भोरचा बाजार असल्याने ग्रामसेवक उपस्थित होते. मात्र, आलेल्या ग्रामस्थांना आज वेळ नाही उद्या या अशी उत्तरे मिळत होती.
ग्रामसेवक निवासी भत्ता घेतात, मात्र, गावात सज्जाच्या ठिकाणीच त्यांनी राहायला पाहिजे, अशी अपेक्षा बेलसर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांच्या कार्यालयाबाहेर असणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात कमी पडत असल्याचे दिसते.
औद्योगिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या शिरूर तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या सणसवाडी येथील ग्रामविकास अधिकारी वेळेत हजर राहत नाही, तर उशिरा येतात आणि लवकर निघून जाता.
आंबेगाव तालुक्यातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मंचर ग्रामपंचायतच्या कामाकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे़ . दुसऱ्या गावात ग्रामसेवक गेले, की नागरिकांना उतारे मिळविणेसाठी ताटकळत राहावे लागते़ (प्रतिनिधी)