पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची गर्दी

By Admin | Updated: November 10, 2016 01:05 IST2016-11-10T01:05:02+5:302016-11-10T01:05:02+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच पेट्रोलपंपावर वाहनचालकांची गर्दी दिसत आहे. मंगळवारी रात्रीपासून ते सकाळपर्यंत कधीही पाचशे रुपयांचे पेट्रोल न भरणारे नागरिकही

Driving Driving At Petrol Pumps | पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची गर्दी

पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची गर्दी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच पेट्रोलपंपावर वाहनचालकांची गर्दी दिसत आहे. मंगळवारी रात्रीपासून ते सकाळपर्यंत कधीही पाचशे रुपयांचे पेट्रोल न भरणारे नागरिकही पाचशेचे पेट्रोल भरत होते. तर काही जण पैसे सुटे करण्याच्या उद्देशाने तीनशे व चारशेचे पेट्रोल भरत होते.
पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या नजरेस पडतील अशा पद्धतीने काही पाट्या लावण्यात आल्या आहेत. यावर कृपया सुटे पैसे द्यावे किंवा पाचशे रुपयांच्या पटीत पेट्रोल, डिझले भरावे. आमच्याकडेही सुट्टे पैसे नाहीत. तरी सहकार्य करावे, असा आशय लिहिण्यात आला आहे.
रोख रकमेसोबतच कार्ड स्वॅप करून पेट्रोल भरण्याचे प्रमाण वाढल्याचे पेट्रोल वितरकांनी सांगितले.
पतंप्रधानांच्या घोषणेनंतर उडालेल्या गोंधळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार पेट्रोल, डिझेल व गॅस पंप या ठिकाणी नागरिकांनी पाचशे व एक हजार रुपये असल्यास तेवढ्याच पूर्ण रकमेचे इंंधन खरेदी करावे. जर इंधन दहा, वीस, पन्नास व शंभर रुपयाचे भरावयाचे असल्यास ग्राहकाने सुटे पैसे देणे गरजेचे आहे.
शुक्रवारच्या (दि. ११) मध्यरात्री बारानंतर जुन्या पाचशे व हजारचे चलनाद्वारे पेट्रोल, डिझेल व गॅस मागणे बेकायदा ठरणार आहे. तरीही जर कुणी रात्री बारानंतर पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचा वापर पंपावर करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या परिपत्रकात नमूद आहे. गोंधळाची परिस्थिती जाणवल्यास पोलीस बंदोबस्तही पेट्रोल पंपास पुरवण्यात येईल,
असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Driving Driving At Petrol Pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.