वंचितांच्या डोळ्यांत स्वप्न

By Admin | Updated: February 15, 2016 01:30 IST2016-02-15T01:30:37+5:302016-02-15T01:30:37+5:30

एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये गुरुकुल पद्धतीची पाहणी केली

Dreams of Wanted People | वंचितांच्या डोळ्यांत स्वप्न

वंचितांच्या डोळ्यांत स्वप्न

पिंपरी : एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये गुरुकुल पद्धतीची पाहणी केली. त्यातून मान्यवरांना वंचित मुलांचे मोठे होण्याचे स्वप्न दिसले. निमित्त होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाचे.
वंचित मुलांना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी गुरुकुलममध्ये वंचित मुलांना चांगल्या शिक्षणासोबत चांगले संस्कार देण्याचे कार्य सुरू आहे. गुरुकुलातच महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या वेळी रमेश पतंगे, विश्वेश्वरशास्त्री द्रविड, इंदुमती काटदरे, सुनील देशपांडे, सर्जेराव ठोंबरे, वा. ना. अभ्यंकर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पाहुण्यांनी गुरुकुलची पाहणी केली. समाजविज्ञान, भाषाविज्ञान, मैत्री गट, संगणक, विज्ञान, आयुर्वेदिक कक्षांना भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलाची माहिती दिली. कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आणि सदस्य रवींद्र नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतिराम भोईर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Dreams of Wanted People