प्रारूप प्रभागरचनेवर आज शिक्कामोर्तब

By Admin | Updated: October 7, 2016 04:04 IST2016-10-07T04:04:14+5:302016-10-07T04:04:14+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात

The draft format will be signed today | प्रारूप प्रभागरचनेवर आज शिक्कामोर्तब

प्रारूप प्रभागरचनेवर आज शिक्कामोर्तब

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभागरचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात फुटला आहे. आराखडा जाहीर होण्यापूर्वीच या पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार निवडण्याची तयारी सुरू केली आहे. लोकमतला मिळालेल्या संभाव्य आराखड्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. आराखडा जाहीर होण्यापूर्वी दोन्ही पक्षांचे नेते आणि इच्छुक कामाला लागले आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होणार आहे. निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्या वेळी १७ लाख, २७ हजार, ६९२ लोकसंख्या होती. त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० असून, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ३६ हजार ५३५ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणे टाकण्यात आली आहेत. बहुसदस्यीय प्रभाग प्रद्धतीनुसार ही निवडणूक होणार आहे. १२८ वॉर्डांपैकी प्रत्येक प्रभागात ४ असे ३२ प्रभाग असणार आहेत. प्रारूप आराखडा शुक्रवारी सकाळी जाहीर केला जाणार असून, आरक्षण सोडतही जाहीर होणार आहे. ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी सोडत काढण्यात येणार असून, त्यात सर्वसाधारण गटाच्या ७०, ओबीसी ३५, अनुसूचित जातीसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ जागांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. याविषयीची रंगीत तालीम झाली असून, निवडणूक विभाग सोडतीसाठी सज्ज झाला आहे.
प्रत्येक प्रभागात एक जागा ही ओबीसीसाठी आरक्षित असून ३२ आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे २३ अशी आरक्षणे लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केली होती. ५५ जागांची संभाव्य आरक्षणे लोकमतने प्रकाशित केली होती. उर्वरित आरक्षणे ड्रॉद्वारे काढण्यात येणार आहेत. प्रारूपरचनेत
हस्तक्षेप झाल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशित केले
होते. त्यानंतर आरक्षणे सर्वप्रथम जाहीर केल्याने महापालिका
प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रभागरचनेत हस्तक्षेप केल्याचे सिद्ध होते.
चिंचवडला सर्वाधिक प्रभाग
४महापालिका निवडणुकीत सर्वाधिक प्रभाग चिंचवड विधानसभेत असणार असून, त्यापाठोपाठ भोसरी आणि पिंपरीत असणार आहेत. सर्वाधिक प्रभाग म्हणजे ५२ वॉर्ड चिंचवडमध्ये असणार आहेत. त्यामुळे चिंचवडकरांची भूमिका सत्तेत निर्णायक ठरणार आहे.
प्रभागनिहाय सदस्य संख्या पुढीलप्रमाणे-
आरक्षणअनुसूचित अनुसूचित नागरिकांचासर्वसाधारणएकूण
जातीजमातीमागासवर्ग
सर्वसाधारण१००११७३६६४
महिला१००२१८३४६४
एकूण२००३३५७०१२८

Web Title: The draft format will be signed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.