दौंडला मोर्चा शांततेत

By Admin | Updated: November 1, 2014 23:12 IST2014-11-01T23:12:22+5:302014-11-01T23:12:22+5:30

दौंड येथे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला.

Doondla Front peace | दौंडला मोर्चा शांततेत

दौंडला मोर्चा शांततेत

दौंड :  दौंड येथे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सतीश थोरात यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला होता. 
राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन रयत परिषद, पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. दरम्यान दलितांवर अन्याय करणा:यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात येत होत्या. या मोर्चात सतीश थोरात, अप्पासाहेब पवार,  अजित बलदोटा, नागसेन धेंडे, आबासाहेब वाघमारे, नगरसेवक अनिल साळवे, नरेश डाळिंबे, विनायक माने, अजरुन गायकवाड, पांडुरंग मेरगळ, आनंद बगाडे,राजू काळे, संजीव आढाव, मंगेश चलवादी, दीपक सोनवणो, किशोर देवकर, रामभाऊ ठाणोदार, प्रशांत धनवे, दादा शितोळे, सतीश सोनोने, सोमनाथ कांबळे, संदीप बो:हाडे, पवन थोरात, दीपक खंडाळे, दीपक पारदासानी उपस्थित होते. 
इंदापूरला आज बंद 
इंदापूर :  नगर दलित हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक व्हावी या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने   उद्या (दि. 2) इंदापूर बंद करण्यात येणार आहे,अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ यांनी दिली आहे.  ते म्हणाले ,या संदर्भात शनिवार (दि. 1)मुलांच्या वसतीगृहात कार्यकत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

Web Title: Doondla Front peace