शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले

By विश्वास मोरे | Updated: June 17, 2025 19:02 IST

संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली. 

पिंपरी : ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, आपण पुन्हा नव्याने सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांच्या बळाने यश मिळवूयात. फुले-शाहू-आंबेडकर, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे, हा विचार जर सगळे म्हणत असतील तर मला मान्य आहे. सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल तर, हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा. पण, भाजपशी संबंध ठेऊ नका. संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली. ताथवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)  पक्षाच्या संकल्प मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, सुलक्षणा धर शिलवंत, अरुण बोऱ्हाडे, देवेंद्र तायडे, इम्रान शेख उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी शहराची विभागणी केली शरद पवार म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांनी  शहराची विभागणी केली आहे.  नदीच्या, रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे अशी शहराची वाटणी झाली आहे. हा नवीन व्यवसाय राजकारणात सुरु झाला आहे. हे स्वच्छ करायचे आहे. नदीसह शहरातील नेतृत्वाबाबतचे चित्र स्वच्छ करायचे आहे. त्यासाठी शहरात मी अधिक लक्ष घालणार आहे.'  विकास आपण केला, त्यांची चिंता करू नका शरद पवार म्हणाले, 'जे पक्ष सोडून गेले, त्यांची चिंता करू नका, नवीन लोक आहेत. आयुष्यात अनेकदा मी अशा गोष्टी अनुभवल्या आहेत. मुख्यमंत्री असताना एकदा  सरकार बरखास्त झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ७० आमदार निवडून आले. दोन महिन्यांनी काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो. तर, दहा दिवसात राज्यात चमत्कार झाला. ७० पैकी ६४ आमदार सोडून गेले. मला आश्चर्य वाटले. लोकांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी चिंताग्रस्त झालो नाही. लोकांशी संपर्क वाढविला. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत जे सोडून गेले, त्यातील ९० टक्के लोकांचा पराभव झाला.'   महिला, तरुणांना संधी दिली जाईलमहापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत महिला, तरुणांना संधी दिली जाईल. प्रत्येक प्रभागात नवीन नेतृत्व तयार केले जाईल.  पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या विचाराकडे होती. मध्यंतरी गडबड झाली आणि भाजपची सत्ता आली. हे चित्र बदलायचे आहे.;   डॉ.  अमोल कोल्हे म्हणाले, 'स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट वाहतूक, पदपथ यावर पंधराशे कोटी खर्च केले. सीसीटीव्ही कधी सुरु होणार, बांगलादेशी रोहिंगे म्हणून कुदळवाडीवर बुलडोजर फिरविला. किती रोहिंगे सापडले. चार हजार लघु उद्योग देशोधडीला लागले. प्रशासकीय राजवटीत आलेला विकास आराखडा एकतर्फी आहे. निळी रेषा बदलली आहे. कुणाच्या फायद्यासाठी? मुळा, पवना आणि इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यापेक्षा त्यावर ब्युटिफिकेशन सुरु आहे. चुकीच्या कारभाराला आला घालण्यासाठी सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे.'

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड