Don't organize any programme in temples on the occasion of Mahavir and Hanuman Jayanti: Pimpri Municipal Corporation orders | महावीर जयंती, हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका: पिंपरी महापालिकेचा आदेश

महावीर जयंती, हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात भजन, किर्तनाचे आयोजन करू नका: पिंपरी महापालिकेचा आदेश

पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीरामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरे करावेत. मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.

महापालिका आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. २५ एप्रिल रोजी महावीर जयंती तर २७ एप्रिल रोजी हनुमान जयंती उत्सव आहे. हे उत्सव दरवर्षी नागरिक एकत्र येऊन मोठ्या संख्येने हे उत्सव साजरे करतात. मात्र, यंदा ोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव, महावीर जयंती आणि हनुमान जयंती उत्सव आपआपल्या घरी साजरा करणे अपेक्षित आहे, असे राजेश पाटील यांनी सांगितले.
..................
विविध धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मंदिरात भजन, किर्तन, पठन इत्यादी किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये.  मंदिरांमधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची आॅनलाईन प्रक्षेपन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून द्यावे, असे आयुक्तांनी आवाहन केले आहे

Web Title: Don't organize any programme in temples on the occasion of Mahavir and Hanuman Jayanti: Pimpri Municipal Corporation orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.