शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

असला गोंधळ नको रे बाबा...! गोंधळातच पिंपरी महापालिकेची सभा तहकूब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 21:38 IST

'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली....आणि मग...भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या भूमिकेत अधिकारी तर अधिका-यांच्या भूमिकेत नगरसेवकमहापौर राहुल जाधव आयुक्त तर, आयुक्त श्रावण हार्डीकर महापौरांच्या भूमिकेत महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब

पिंपरी चिचवड : भटकी कुत्री, डुकरे, निलंबन, बढती रद्द अशा अभूतपर्व गोंधळाने अभिरुप महासभा गाजली. पवना धरण शंभर टक्के भरले असूनही शहरवासियांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यासाठी थेट ढगामधून स्ट्राद्वारे शुद्ध पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्याने पालिका कर्मचा-यांना कार्यालयात येताना जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिका-यांना घरी बसून काम करु देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनानिमित्त अभिरुप महासभा झाली. भटकी कुत्री सभागृहात सोडल्याने प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे महासभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. निलंबन, बढती रद्द अन् गोंधळाने अभिरुप महासभा चांगलीच गाजली.  त्यात नगरसेवकांच्या भूमिकेत अधिकारी तर अधिका-यांच्या भूमिकेत नगरसेवक होते. महापौर राहुल जाधव यानी आयुक्तांची भूमिका बजावली. (जाधव यांनी आयुक्तांसारखीच वेषभूषा केली)तर, आयुक्त श्रावण हार्डीकर यानी महापौरांच्या भूमिका वठविली. उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड या अतिरिक्त आयुक्त, सभागृह नेते एकनाथ पवार नगरसचिवांच्या भूमिकेत होते. मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी चोपदार म्हणून भूमिका पार पाडली. तर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर उपमहापौर, लेखापाल जितेंद्र कोळंबे स्थायी समिती अध्यक्ष, सह शहर अभियंता प्रवीण तुपे सभागृह नेत्याच्या, तर अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका साकारली.'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं' या गाण्याने सभेला सुरुवात झाली. अभिरुप महासभेच्या विषयपत्रिकेवर पाच विषय होते. त्यापैकी दोन विषय मंजूर केले. सभेला सुरुवात होताच नगरसचिवाच्या भुमिकेत असलेल्या एकनाथ पवार यांनी नगरसेवक काम करत नसल्याने त्यांना निष्कासित करावे, महापालिकेची इमारत विकण्याचा विषय वन-के खाली दाखल करुन घेतला. नगरसेवकाच्या भूमिकेत असलेल्या उल्हास जगताप यांनी नगरसचिवांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक अधिका-यांच्या वेशभूषेतील दत्ता साने म्हणाले, सल्लागार नागपूरवरुन येत आहे. त्यांच्या खुलाशावर समाधान न झाल्याने आयुक्तांच्या भुमिकेत असलेले राहुल जाधव म्हणाले, शहरवासियांसाठी उजनी धरणातून पाणी आणले जाईल. उजनी धरणाचे पाणी चांगले आहे. सर्वांना समान पाणीपुरवठा केला जाईल. मी पारदर्शकपणे काम करत असून सत्ताधा-यांना पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले आहेत. त्याचे विरोधकांनी पुरावे द्यावेत, असे खुले आव्हानही त्यांनी केले.विरोधी पक्षनेते दिलीप गावडे यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सत्ताधा-यांसोबत असल्याचे सांगितले. सभागृह नेते तुपे म्हणाले, शहरावर जास्तीत-जास्त ढग आणण्यासाठी आमचे केंद्रापासून प्रयत्न सुरु आहेत. श्रावण हर्डीकर म्हणाले, सगळ्यांना पाणी पाजणारच, ढग उभे करणार, कोणाला तहानलेले ठेवणार नाही. दरम्यान, मुख्यलेखापरिक्षक आशा शेंडगे यांना समाधानकारक खुलासा न करता आल्याने आयुक्त जाधव यांनी त्यांची बढती रद्द केली. आयुक्तांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने नगरसेवक ओंभासे, भोजने यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. कागदे फिरविली. त्यामुळे महापौर हर्डीकर यांनी ओंभासे यांना तीस वर्षांसाठी निलंबित केले. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. गोंधळामुळे महापौर हर्डीकर यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली. 

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकर