शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Maharashtra Election 2019: ''सत्तर हजार कोटी गेले कुठे चौकशी करायला नको''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:47 PM

न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल.

पिंपरी : न बोलवताच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात गेले. बोलावल्यानंतर जावेच लागेल. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कुठे गेले याची चौकशी व्हायला नको, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरीतील सभेत केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मैदानावर शिवसेनेची सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा सदस्य अमर साबळे, महापौर राहुल जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, उपनेत्या डॉ. नीलम गो-हे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,  जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, डॉ. रघुनाथ कुचिक आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही ठरवलय युतीचेच सरकार येणार आहे. गोरगरिबांच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी युती केली आहे. लोकसभेला विरोधी पक्ष थोडा तरी शिल्लक होता. आता विधानसभेच्या निवडणुकीतही तोही शिल्लक नाही. काही ठिकाणी उमेदवारही दिले नाहीत. त्याच्याकडून नाराज होऊन नेते बाहेर पडताहेत. उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून विरोधीपक्षाची अवस्था लक्षात येईल. युतीसरकार लक्ष्य करीत आहेत, ही पवारांची टीका चुकीची आहे. दहा रुपयात जेवण, एक रूपयात आरोग्य तपासणी, मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आणणार आहे.’’धरण भरण्याची वाट पाहत होतोविकासकामांवर आणि आश्वासनांवर होणा-या टीकांचा समाचार ठाकरे यांनी घेतला. ठाकरे म्हणाले, ‘‘शेतकरी कर्जमाफी ऐवजी कर्जमुक्ती देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. बँक घोटाळा, सिंचनातील सत्तर हजार कोटी कोठे गेले याची चौकशी व्हायला नको? दंगल प्रकरण घडून गेल्यानंतर दहा वर्षांनी  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केस उकरून काढली. त्यावेळी सत्तेचा दुरूपयोग नव्हता का? हे राजकारण नव्हते का?’’  दहा रूपयात जेवण या आम्ही दिलेल्या आश्वासनावर अजित पवारांनी टीका केली. पाच वर्षे काय केले? अशी टीका केली. पाच वर्षे दुष्काळ होता, धरण भरायची वाट पाहात होतो, या ठाकरे यांच्या वक्तव्यावर हशा पिकला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019