‘साद’ची दृष्टिहीनांसोबत दिवाळी
By Admin | Updated: November 12, 2015 02:24 IST2015-11-12T02:24:25+5:302015-11-12T02:24:25+5:30
नातेवाइकांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत दिवाळी सर्व जण साजरी करतात. पण, अंध मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही निराळाच.

‘साद’ची दृष्टिहीनांसोबत दिवाळी
पिंपरी : नातेवाइकांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत दिवाळी सर्व जण साजरी करतात. पण, अंध मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही निराळाच. दृष्टिहीनांची दिवाळीदेखील झगमगावी, यासाठी ‘साद’ फाउंडेशनने दिवाळीत १२५ अंधांना फराळ वाटून दिवाळी साजरी केली.
आकुर्डीतील खंडोबा मंदिरात अंधांच्या कुटुंबासाठी फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी अंध कुटुंबीयाना दिवाळी फराळवाटप केले. अंध गायकांनी ‘सप्तसूर’ हा आॅर्किस्ट्रा सादर केला.
अंधांच्या मनगटातील बळ बनवून त्यांचा विश्वास वाढविणे, हे समाजाचे काम आहे. दृष्टिहीनांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, दिलीप सोलंकी, पोलीस निरीक्षक संजय नाईक, तहसीलदार किरण काकडे, भाऊसाहेब कोकाटे, माजी पोलीस आयुक्त सुधीर चौगुले, रंगनाथ उंडे उपस्थित होते. प्रवीण जाधव, अनिल दळवी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)